फलटण – अत्यंत चुरशीचा झालेल्या फलटण नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर हे 600 मतांनी निवडून आले असून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.तब्बल ३० वर्षांनी फलटण नगरपालिकेत सत्तातर झाले आहे.
फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना मित्र पक्ष अशी जोरदार लढत झाली. दोन्ही नाईक निंबाळकर घराण्याच्या अस्तित्वाची ही निवडणूक होती. या निवडणुकीसाठी ७१.५० टक्के मतदान झाले होते.आज येथील शासकीय गोदाम मध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या तीनही प्रभागांमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली होती प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग झाले आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना 16489 तर शिवसेनेचे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना 15889 मते मिळाली. भाजप राष्ट्रवादीचे 18 तर शिवसेना व मित्र पक्षाचे 9 उमेदवार निवडून आले आहेत., फलटण नगरपालिकेत तब्बल ३० वर्षांनी सत्तातर झाले आहे.
प्रभाग क्रमांक १ अ आणि ब मधून भाजपचे अस्मिता लोंढे आणि सोमाशेठ जाधव
प्रभाग क्रमांक २ अ मधून राष्ट्रवादीच्या मीना काकडे, ब मधून सुपर्णा अहिवळे
प्रभाग क्र ३ अ मधून राष्टवादीचे सचिन अहिवळे, ब मधून भाजपच्या सुलक्षणा सरगर
प्रभाग ४ अ शिवसेनेचे मधून रुपाली जाधव, आजरुद्दीन उर्फ पप्पू शेख
प्रभाग क्र ५ भाजपाच्या अ मधून कांचन व्हटकर, ब मधून रोहित नागटिळे
६ अ मधून भाजपचे किरण राऊत, ब मधून मंगलादेवी नाईक निंबाळकर
७ अ भाजपच्या स्वाती भोसले, ब मधून शिवसेनेचे पांडुरंग गुंजवटे
८ अ शिवसेनेचे विशाल तेली, ब मधून भाजपच्या सिद्धाली शहा
९ अ कृष्णा विकास आघाडीच्या कविता मदने ब मधून राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज पवार
१० अ शिवसेनेच्या श्वेता तारळकर, ब मधून भाजपाचे अमित भोईटे
११ मध्ये भाजपचे अ मधून संदीप चोरमले ब मधून प्रियदर्शनी भोसले
प्रभाग क्र १२ शिवसेनेचे अ मधून विकास काकडे, ब मधून स्मिता शहा
१३ अ मधून भाजपचे मोहिनी हेंद्रे,ब मधून सौं रुपाली सस्ते, क मधून राष्ट्रवादीचे राहुल निंबाळकर विजयी झाले आहेत.
भाजप राष्ट्रवादी युतीच्या मध्ये भाजपचे 12 आणि राष्ट्रवादीचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. त्याच पद्धतीने भाजप पुरस्कृत २ अपक्ष निवडून आले आहेत.
शिवसेना व मित्र पक्षांमध्ये शिवसेनेचे ७, राष्ट्रीय काँग्रेसचा १ व कृष्णा भीमा आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे.
फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये 1991 सालापासून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता होती तब्बल ३० वर्षे त्यांची सत्ता कायम राहिली यंदाच्या नगरपालिका निवडणूकीत सत्ता बदल करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतःच्या भावाला निवडून आणण्याबरोबरच स्वतःचे 18 उमेदवार निवडून आणत बहुमताने सत्ता मिळवली आहे.