स्थानिक

पित्याने पाहिलेले नगराध्यक्षपदाचे स्वप्न पुत्राने पूर्ण केले, नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पदभार स्वीकारताना अनेकांना त्यांच्या पित्याची आठवण

फलटण{नसीर शिकलगार}- फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कारभार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी हाती घेताना त्यांच्या वडिलांनी म्हणजे माजी खा. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे.

दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या जीवनात प्रचंड संघर्ष करून यश मिळविले. थेट खासदारकी पर्यंत मजल मारून इतिहास घडविला. हे सर्व होत असताना त्यांची फलटणचे नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती. तशी संधीही आली होती मात्र ती पूर्ण झाली नव्हती.नियतीच्या मनात वेगळेच काही असल्याने त्यांची इच्छा त्यांचे जेष्ठ सुपुत्र समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे बंधू माजी खा. रणजितसिंह यांच्या मदतीने नगराध्यक्ष होऊन पूर्ण केली आहे. 

अनेक जुने जाणत्या कार्यकर्त्याच्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना जुन्या आठवणीं जाग्या झाल्या.

 1991 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारणात प्रथमच उतरलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची सत्ता नगरपालिकेत आणली होती. श्रीमंत रामराजे हे नगराध्यक्ष झाले होते. यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी त्यांना नगरपालिकेत साथ दिली होती.नंतर हिंदुरावही उपनगरध्यक्ष झाले होते. 1995 साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आमदार झाले. त्यांना हिंदुरावांनी पाठिंबा देत जाहीर प्रचारही केला होता.आ. श्रीमंत रामराजे आमदार झाल्याने त्यावेळी नगराध्यक्षपद हिंदुराव नाईक निंबाळकर यांना मिळेल असे लोकांना वाटत होते. हिंदुरावांची पण तशी इच्छा होती मात्र त्यावेळी ते साध्य झाले नाही.हिंदुरावांचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र 1996 साली ते लोकसभेला विजयी होऊन खासदार झाले. त्याकाळच्या फलटण नगरपालिकेच्या एकाच बॉडीतील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष खासदार आणि आमदार झाले होते हा मजेशीर इतिहास त्याकाळी चांगला चर्चेला गेला होता.

३४ वर्षानंतर नियतीने चक्र फिरविले. फलटण नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडायचा होता. यावेळी चित्र वेगळे होते आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र समशेरसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरले. आपले बंधू समशेरसिंह यांना निवडून आणण्याबरोबरच नगरपालिकेतील सत्ता हाती घेण्यासाठी माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड परिश्रम घेतले आणि सत्ता आणली.  जनतेने समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून देऊन नगराध्यक्षपदी बसविले. आज हिंदुराव जिवंत असतें तर त्यांना प्रचंड आनंद झाला असता हे मात्र निश्चित समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी एक प्रकारे आपल्या वडिलांचे नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पूर्ण केल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button