जावली(अजिंक्य आढाव ) – मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होत असतो व शरीर तंदुरुस्त बनते यामुळे अभ्यासामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गती प्राप्त होते त्यामुळे खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी केले.

रॉयल इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज जावली यांच्या वतीने स्पोर्ट – डे निमित्तान करण्यात आलेल्या शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अमोल चौरे, प्राचार्य सौ. कांचन चौरे, फलटणमधील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर अमर पिसाळ, निखिल डोंबे, परिश्रम न्यूज संपादक अजिंक्य आढाव इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पुढे दादासाहेब चोरमले म्हणाले की, अलीकडच्या काळात खेळाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून खेळाकडे जर व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले तर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचे यश प्राप्त करू शकतो रॉयल इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विविध खेळ खेळले जातात तसेच या विद्यालयाच्या माध्यमातून भविष्यात निश्चितच राज्य राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करून चोरमले म्हणतात की, आज खेळाला अन्याय साधारण महत्व प्राप्त झाले आहे स्पर्धा परीक्षेमध्ये खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवल्या जात असल्यामुळे खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनणे गरजेचे असल्याचेही शेवटी चोरमले म्हणाले.
स्पोर्ट डे च्या निमित्ताने विद्यालयाने विविध खेळांचे आयोजन केले होते. यावेळी प्रामुख्याने धावणे, हॉलीबॉल, कबड्डी, खो- खो, लंगडी, डॉज बॉल, गोळा फेक, लांब उडी , उडी, रिले, खेळांचे अशा विविध खेळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अतिशय अटीतटीचे सामने मैदानावर पहिला मिळाले.
Back to top button
