फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. प्रियदर्शनी भोसले, स्वीकृतपदी सुदामराव मांढरे, अशोकराव जाधव, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची निवड
फलटण – फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज फलटण नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव सौं प्रियदर्शनी भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सौं प्रियदर्शनी भोसले यांचे सासरे दिलीपसिंह भोसले यांनी यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून तर त्यांच्या सासू सौं मधुबाला भोसले यांनी नगरसेविका म्हणून काम पहिले आहे.
याच वेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचेच माजी ज्येष्ठ नगरसेवक सुदामराव मांढरे, अशोकराव जाधव, शिवसेनाचे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सर्वांचे माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले,ऍड नरसिंह निकम,अभिजित नाईक निंबाळकर, सर्व नगरसेवक यांनी अभिनंदन केले आहे