फलटण{नसीर शिकलगार}- – फलटण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी वातावरण तापत असताना अनेक उमेदवारांच्या विविध तऱ्हा चव्हाट्यावर येत आहेत. मतदारांमध्ये त्याबद्दल नाराजी असून काहींना तर मतदार धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचे सर्वे मधून दिसून येत आहे. एक मात्र खरे की ही निवडणूक कोणालाच सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रक्षक रयतेचा टीम तर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वी तसेच उमेदवारी घोषित झाल्यानंतर करण्यात आलेल्या सर्व्हेत ही निवडणूक वाटते तेवढी कोणाला सोपी नसल्याचे दिसून येत आहे. अनेक उमेदवाराबद्दल नाराजी असून मतदार ती उघडपणे बोलून दाखवत आहेत. काहीना पक्षांतर्गतच विरोध असून त्यांना धडा शिकवण्याच्या नादात काहींची तयारी सुरू आहे. काही उमेदवार पैशाच्या मस्तीच्या जोरावर निवडून येण्याच्या वल्गना करत आहे तर काहीजण माझा कोणीच पराभव करू शकत नाही अशा भीमदेवी थाटात वावरत आहे.
एका उमेदवाराबद्दल महिला वर्गात प्रचंड नाराजी असून त्या उमेदवारामुळे दोन्ही गण आणि गट जाण्याची शक्यता आहे. एक उमेदवार तर पहिल्यापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागला असून भांडून त्याने जागा गळ्यात पाडून घेतली आहे. कॅटेगरी बसत नसताना सुद्धा उमेदवारी अर्ज भरला आहे. पैशाच्या जोरावर निवडून येण्याचा त्याचा दावा असला तरी त्याची साखर पेरणी कितपत यशस्वी होते हे कळेल.
एक उमेदवार तर पैसे बुडवणारा आहे. त्याने तर अनेकांचे पैसे बुडवले असून एक तर खाजगी सावकारी अवैधरित्या करणारा आहे. पैशाच्या जोरावर निवडून येऊ अशा अपेक्षा अनेक उमेदवारांच्या आहेत मतदारांना खरेदी करण्याच्या तयारी त्यांनी सुरू केली आहे. अशा तऱ्हा दोन्ही पक्षातील अनेक उमेदवारांच्या असून त्यांच्या तऱ्हा रक्षक रयतेचा न्यूज च्या माध्यमातून निश्चितच चव्हाट्यावर आणण्यात येणार आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांच्या तऱ्हा बातम्यांच्या स्वरूपात रक्षक रयतेचा न्यूजने चव्हाट्यावर आणल्या होत्या. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक उमेदवारांच्या तऱ्हा चव्हाट्यावर आणण्यात येणार आहेत.
रक्षक रयतेचा न्यूजच्या सर्व्हेमध्ये ही निवडणूक प्रत्येकालाच जड जाणारी असल्याचे दिसत आहे दोन्ही पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण रंगले असले तरी असले राजकारण मतदारांना पटत नसल्याने दोन्ही पक्षाबद्दल नाराजी आहे. त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढी कोणालाच सोपी नाही एवढे मात्र निश्चित.