स्थानिक
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पद भाजपकडे, अशक्य विजय शक्य केला
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रणनीती यशस्वी

फलटण -सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ प्रिया महेश शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भैया भोसले यांची निवड झाली आहे. भाजपने सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवला आहे अत्यंत चुरशीच्या लढतीत अशक्य विजय भाजपच्या नेते मंडळींनी शक्य करून दाखवला आहे. कालपासून सातारा मध्ये तळ ठोकून बसलेले भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रणनीती यशस्वी ठरली आहे.
सातारा जिल्हा परिषदेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा केला होता भाजप पेक्षा दोघांची सदस्य संख्या जास्त असताना सुद्धा भाजपने दोन्ही पक्षातील सदस्य फोडून भाजपचा झेंडा जिल्हा परिषद वर फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी सौ मनीषा फडतरे व अशोक पाटील यांना तर भाजपने कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सुप्रिया शिंदे व राजू भैया शिंदे यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी उतरविले होते जिल्हा परिषदेच्या बाहेर खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सहलीला गेलेले अनेक सदस्य थेट जिल्हा परिषद मध्ये आले होते. भाजपचे 27 राष्ट्रपती काँग्रेसचे 20 व शिवसेनेचे 15 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते बहुमतासाठी 33 सदस्य हवे होते. भाजपने 33 मते मिळवीत अध्यक्ष पद मिळवले तर राष्ट्रवादी शिवसेनेच्या सदस्याला 32 मते पडली भाजपने ऑपरेशन लोटस राबवीत राष्ट्रवादी,शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फोडून सत्ता स्थापन केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनी पडद्यामागून तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पडद्यापुढे येऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न केले.
राष्टवादीचे जि प. सदस्य अनिल देसाई,संतोष मांडवे या दोन्ही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर
रात्री गुन्हा दाखल केला होता निवडीसाठी आले असता जिल्हा परिषद मधून त्यांना ताब्यात घेतले.

