मुंबई : अखिल महाराष्ट्र पीर कलंदर शिकलगार समाजसेवा संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन लेंगरे {तालुका खानापूर} येथे 26 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. अधिवेशनात ,चालू वर्षी आदर्श माता पिता पुरस्कार व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती राज्यसंघटनेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास बाबर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील शिकलगार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे,त्यांनी आवाहन केले.
सालाबादप्रमाणे दहावी,बारावी तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. आदर्श माता पिता पुरस्कार व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये, ताजमा इलाही शिकलगार व इलाही चांद शिकलगार,कुंडल, सुलताना दिलावर शिकलगार व दिलावर भिकू शिकलगार( नेर तालुका खटाव),शबाना इलाही शिकलगार व इलाही उंबर शिकलगार, पारे तालुका खानापूर, लैलाबी शब्बीर शिकलगार व ॲड शब्बीर हाजी इस्माईल शिकलगार,सातारा, शाजन महमद शिकलगार व म.महमद रसूल शिकलगार, पारे फिरदोश रियाज शिकलगार व रियाज अब्दुलगणी शिकलगार, कोरेगांव यांना आदर्श माता पिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.तसेच अजीज इब्राहिम शिकलगार,लेंगरे व दिलावर दादू शिकलगार, पुणे यांना यावर्षीचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लेंगरे येथील म. गुलाब सय्यद शिकलगार लेंगरे यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्याच्या पुढे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये रोख बक्षीस व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विविध कला ,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.