स्थानिक

माझा भारत हा खूप बलशाली बनणार आहे’ – प्राचार्य रवींद्र येवले,,प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

फलटण- : सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य रवींद्र येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “हे विद्यार्थी म्हणजे उद्याचा बलशाली भारत आहेत. त्यामुळे माझा भारत हा खूप बलशाली बनणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी याप्रसंगी प्रमुख पाहुणे रवींद्र येवले  ,सौ नीलम पाटील चार्टर्ड प्रेसिडेंट लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम,सौ प्रीतम पाटील, डॉ .अशोक नाळे उपसरपंच कोळकी ग्रामपंचायत कोळकी, राजकुमार काकडे लोकध्यास संपादक ,पत्रकार विकास शिंदे , शिवाजी भुजबळ सदस्य ग्रा.पं कोळकी, मनोज पवार,स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ संध्या गायकवाड , प्राचार्या सौ सुजाता गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सुजाता गायकवाड यांनी केले. त्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आदिती गवारी हिने स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले.

यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी ‘पवित्रतेचा पुण्याईचा आमचा भारत देश’ तसेच ‘वो देश मेरे, तेरे शान के सदके’ या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. इयत्ता दुसरीतील दुर्गेश सोनवलकर याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी भाषण केले. तसेच यूकेजीतील गार्गी बळीप हिने महात्मा गांधी, तन्वी पोळ हिने पंडित जवाहरलाल नेहरू, तर इयत्ता पहिलीतील रियांश पायसोडे याने भगतसिंग यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मागील शै वर्षातील (2025-26) वर्गनिहाय बेस्ट स्टुडेंट व 100% उपस्थित विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी नारीशक्तीविषयी जनजागृती करणाऱ्या नाटिकेचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पिरॅमिड प्रात्यक्षिकानेही कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी सौ. नीलम पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षक, विद्यार्थी व पालकांना ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक करत त्यांनी प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी १,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्स भेट दिले. संचालिका संध्या गायकवाड यांनी संस्थेच्या वतीने सर्वांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आर्यन विजय भोसले या माजी विदयार्थ्याने लिहिलेल्या सायकॉलॉजी ऑफ कंट्रोल या इंग्रजी पुस्तकाबद्दल त्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गोसावी यांनी केले, तेजश्री बळीप यांनी  आभार मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button