स्थानिक

उद्योजक समीर खराडे पाटील यांचा निर्णायक मतांचा पाठिबा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणार

मुंबई : तरडगाव जिल्हा परिषद गट व पाडेगाव पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे नियोजन व रणनीती ठरवण्यासाठी मुंबईतील मुधाई डेअरी फार्म येथे महत्त्वपूर्ण विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक उद्योजक समीर खराडे यांच्या पुढाकारातून पार पडली.

बैठकीला बीएसटी कर्मचारी, माथाडी कामगार, विविध क्षेत्रांत कार्यरत कामगार, काही अधिकारी वर्गातील प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढवणे, मतदारांशी संपर्क करून मतदारांना गावाकडे व्यवस्थित रित्या घेऊन जाण्यासाठी नियोजन करण्यात आले आणि हे मतदान अतिशय गुप्तपणे करण्याची रणनीती यावेळी ठरवण्यात आली.

महानगरपालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने नियोजनबद्ध मतदान झाले होते, त्याच धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही निर्णय घेण्यात आला असल्याचे बैठकीत नियोजन करण्यात आले. समीर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती आखली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

फलटण तालुक्यातील एका वरिष्ठ नेत्यासोबत मतदानासाठी उमेदवार निश्चितीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक पातळीवरील सामाजिक समीकरणे व कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन उमेदवार ठरवला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समीर खराडे यांनी बजावलेली निर्णायक योग्य रणनिती मुळे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे पुतणे व माथाडी नेते ऋषिकांत शिंदे पुत्र मा सौरभ भैय्या शिंदे याचे सह सातारा जिल्ह्यातील वैशाली ताई मस्कर व दिपाली सकपाळ हे नगरसेवक विजयी करण्यात असलेली समीर खराडे यांची भूमिका देखील बैठकीत विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली. आगामी तडगाव जिल्हा परिषद गट व पाडेगाव पंचायत समिती गण निवडणुकीत सुमारे २५० ते ३०० मते निर्णायक ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त करत ठरल्याप्रमाणे प्रत्येक मतदान मतपेटी पर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करण्यात आले.

या बैठकीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button