स्थानिक

हात उसने पैसे मागितल्याने न वटणारा चेक देऊन फसवणूक; आरोपीला ५ महिने कारावास व ५ लाखांच्या दंडाची शिक्षा!

फलटण – हात उसने दिलेले पैसे माघारी मागितले म्हणून न वाटणारा स्वतःच्या खात्याचा चेक देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सरडे तालुका फलटण येथील सुरेश माणिक मोरे याला पाच लाख रुपये नुकसान भरपाई व पाच महिने कारावासाची शिक्षा फलटण येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती जे एस खेडकर गोयल न्यायालयाने सुनावली आहे

      याबाबतची सविस्तर माहिती अशी कि सरडे तालुका फलटण येथील  दत्तात्रय सखाराम भोसले यांनी आपल्या ओळखीच्या सुरेश माणिक मोरे या इसमाला हात उसने म्हणून सुमारे सव्वादोन लाख रुपयेदिलेले होते त्यांनी दिलेल्या मुदतीत हात उसने दिलेले पैसे सुरेश मोरे यांनी माघारी न दिल्याने सुरेश मोरे यांनी खात्यावर पैसे शिल्लक नसताना देखील खोटा व न वटणारा धनादेश श्री दत्तात्रय भोसले यांना दिले होते सदरचा चेक वेळेत न वटल्याने व खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने चेक बांऊस झाला होता या फसवणूकीच्या विरोधात भोसले यांनी न्यायालयात चेक बाऊन्स केस दाखल केली होती न्यायालयाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गुणवरेच्या शाखा अधिकारी अधिकारी सौ योगिता साळुंखे  व अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवून वस्तूची पडताळणी करून व कागदपत्रांचे अवलोकन करून व साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून वस्तुस्थितीची पडताळणी करून आरोपी मोरे यास परक्रम्य अधिनियम 18 81 कलम 138 नुसार दोषी मानून न्याय दंडाधिकारी फलटण प्रथम श्रेणी श्रीमती जे.एस खेडकर गोयल यांनी फिर्यादी  भोसले यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व पाच महिन्याचा कारावास देण्याची शिक्षा सुनावली आहे सदरची रक्कम वेळेत न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास देण्याचा आदेश दिला आहे फिर्यादी दत्तात्रय भोसले यांना अँड.निलेश भोसले यांनी वेळोवेळी मदत करून एडवोकेट  उमेश कदम यांनी न्यायालयात फिर्यादीची बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला व आरोपीस शिक्षा मिळवून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button