स्थानिक

अखेर हातोडा चालला रक्षक रयतेचा न्यूज सडेतोड वृत्ताचा दणका! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या निवासस्थानाच्या संरक्षक भिंतीचे अतिक्रमण अखेर हटविले

फलटण :- रक्षक रयतेचा न्यूजने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील संरक्षक भिंतीच्या अतिक्रमणाचा मुद्दा ठळकपणे दि. ४ जून रोजी मांडल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित अतिक्रमण हटविल्याचे दिसून आले आहे.

दि ४ जून रोजी रक्षक रयतेचा न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये पालखी मार्ग अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान इतर नागरिकांवर कारवाई होत असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या निवासस्थानासमोरील संरक्षक भिंतीचे अतिक्रमण मात्र कायम असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

या वृत्तानंतर नगरपालिका प्रशासनाने दखल घेत संबंधिताना कळविले . संरक्षक भिंतीलगत असलेले अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हटविण्यात आले असून, भिंत काढण्याची प्रक्रिया सुरू आहे

रक्षक रयतेचा न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर झालेल्या या कारवाईमुळे पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी आणि लोकहितासाठी केलेल्या वृत्तांकनाची प्रभावीता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 रक्षक रयतेचा न्यूज च्या वृत्ताच्या दणक्यानंतर PWD ने स्वतःहून ही भिंत तोडण्याची प्रक्रिया सुरू केली. भिंतीचा पुढील भाग पाडण्यात आला असून जमिनीवर विटांचा ढीग पडला आहे.

या कारवाईमुळे “कायदा सर्वांसाठी समान आहे” हा संदेश फलटणकरांमध्ये गेला असून, स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे जोरदार स्वागत केले आहे.

कोणत्याही दबावाला बळी न पडता, लोकहिताचा प्रश्न लावून धरल्यास प्रशासन कशा प्रकारे ताळ्यावर येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ही कारवाई म्हणजे पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचा आणि सत्याचा विजय आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button