स्थानिक

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त फलटण येथे अभिवादन

फलटण: — देशाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, प्रतिसरकारचे संस्थापक *क्रांतिसिंह नाना पाटील* यांची जयंती आज दि. 3 ऑगस्ट रोजी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोठ्या आदराने साजरी करण्यात आली. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील बहे या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र आहे. वडील रामचंद्र पाटील. वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त असल्याने लहानपणापासूनच नानांच्या गळ्यात पांडुरंगाची माळ पडली होती.

1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सातारच्या जनतेला एकत्र करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. 1943 ते 1946 या काळात सातारच्या 1500 हून अधिक गावांमध्ये “प्रतिसरकार” स्थापन करून न्याय, शिक्षण आणि प्रशासनाची समांतर व्यवस्था चालवली. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

या वेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, अँड.विजयराव नेवसे आदी उपस्थित होते.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य आणि त्याग आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button