स्थानिक

फलटणच्या विकासासाठी सर्व तोपरी मदत करण्याची ग्वाही ना. अमित शहा यांनी माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली

फलटण – माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेऊन फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्ग त्वरित गती देण्याची मागणी केली.फलटणच्या विकासासाठी सर्व तोपरी मदत करण्याची ग्वाही ना. अमित शहा यांनी यावेळी दिली.

माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री ना.श्री.अमितजी शहा यांची त्यांचे नवी दिल्ली येथील शासकीय दालनात भेट घेतली, यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि आगामी रणनीतीवर चर्चा केली तसेच पंढरपूर – फलटण रेल्वे प्रकल्पाला गती देणे, फलटण शहरा लगतच्या बाणगंगा नदीचा नमामि गंगे योजनेमध्ये समावेश करणे आणि विविध विषयांवर सखोल चर्चा केली. फलटणच्या विकासासाठी सर्व तोपरी मदत करण्याची ग्वाही ना. अमित शहा यांनी यावेळी दिली.रणजितसिंह यांच्या तळमळीचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button