स्थानिक
प्रभाग ९ मध्ये विकासकामांचा धडाका; राझिया मेटकरी यांना ताकद देणार – माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची ग्वाही

फलटण –: फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये १५ ऑगस्ट आणि स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी, “प्रभाग ९ च्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि कुमारी राझिया मेटकरी यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.

फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि वृद्धांसाठी सिमेंट बेंच बसवणे अशा विविध सामाजिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.
राझिया मेटकरी यांना ताकद देणार: समशेरसिंह नाईक निंबाळकर
आपल्या भाषणात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “कुमारी राझिया मेटकरी यांच्या मागणीनुसार प्रभागात इथून पुढेही सातत्याने विकासकामे होत राहतील. राझिया मेटकरी यांचा पराभव आमच्या जिवारी लागला असून, त्यांना नगरसेवक करूनच दाखवू. या प्रभागात त्यांची संपूर्ण ताकद पाठीशी उभी केली जाईल.”
महत्त्वाच्या घोषणा व निधी मंजूर: रणजितसिंह नाईक निंबाळकर
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निष्ठावंत कार्यकर्ते मेहबूब मेटकरी यांच्या कामाचे कौतुक करत कुमारी राझिया मेटकरी यांची ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ समितीवर संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली .
फिरोजभाई शेख व मेहबूबभाई मेटकरी यांच्या मागणीनुसार मेटकरी गल्ली येथील मुस्लिम सभागृहाच्या दुरुस्तीसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून १२ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. मेटकरी गल्ली प्रभाग ९ मधील इतर समाजासाठी सभागृह बांधण्याच्या मागणीची दखल घेत ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या प्रसंगी आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव, अभिजित नाईक निंबाळकर, रणजितसिंह भोसले, बाळासाहेब कदम, अमोल सस्ते, फिरोजभाई आतार, रियाजभाई इनामदार, बाळासाहेब मेटकरी, बबलूभाई मोमीन यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रियाज इनामदार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कुमारी राझिया मेटकरी यांनी मानले.





