स्थानिक

ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत आयडियलच्या ‘आयडियल बाप्पा’चे दिमाखात आगमन

फलटण:— येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाडक्या ‘आयडियल बाप्पा’चे अत्यंत मंगलमय व उत्साही वातावरणात आगमन झाले. सकाळपासूनच शाळा परिसरात फुलांची सजावट, सुंदर रांगोळ्या, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक पारंपारिक वेषात उपस्थित होते.

शाळेच्या बिरदेवनगर शाखेत सार्थ भोईटे यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठापना व मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे  व सेक्रेटरी निखिल सर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व उकडीच्या मोदकांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

बिरदेवनगर शाखेप्रमाणेच लक्ष्मीनगर शाखेतही चैतन्य शिंदे सर यांच्या हस्ते श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली. दोन्ही शाखांमध्ये आरतीनंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना भारतीय सण, परंपरा व समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी आणि त्यांच्यात सामाजिक बांधिलकी रुजावी, या उद्देशाने शाळेच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा गणेशोत्सव अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने साजरा केला जातो.

​या सोहळ्यास शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button