स्थानिक

फलटण येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

फलटण- ‘जय नरहरी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सर्व शाखीय हिंदू सुवर्णकार समाज संस्थेंच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ८३३ वी जयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन आणि भावपूर्ण आरतीने झाली. या प्रसंगी समाजातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व रमेश पालकर आणि ज्येष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक अजय माळवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संत नरहरी महाराजांच्या जीवनकार्याचा व समतेच्या विचारांचा जागर करत सामाजिक ऐक्य आणि प्रगतीचा दृढ संकल्प करीत आगामी काळात महाराजांची जयंती विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरिपाल महामुनी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण बोथेकर, सचिव अमित कांबळे, सहसचिव विकास महामुनी, खजिनदार गणेश दीक्षित, सहखजिनदार विलास दीक्षित यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य संजय कांबळे, पंकज महामुनी, गजानन धर्माधिकारी आणि मनोज दीक्षित, किरण शहाणे, किरण धर्माधिकारी, पराग कांबळे, विजय बोथेकर, डॉ. बोथेकर, सूरज कांबळे, मंदार कांबळे रमेश महामुनी यांच्यासह सुवर्णकार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button