फलटण:– फलटण शहरातील महिला भगिनींसाठी शनिवार दि. २६ रोजी सायंकाळी ५ वाजता मनोरंजनाचा आणि बक्षिसांचा भव्य महासंग्राम आयोजित करण्यात आला आहे. ‘रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन’, ‘लायन्स क्लब’, ‘माळजाई मंदिर उद्यान समिती’, ‘गगनगिरी ज्वेलर्स’, ‘इंद्राक्षी कलेक्शन’ आणि ‘सचिनशेठ गानबोटे फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध निवेदक आनंद पवार प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना विविध खेळांच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी मिळणार आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक, मानाची पैठणी,द्वितीय क्रमांक मोती कडा, तृतीय क्रमांक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांसाठी ‘लकी ड्रॉ’द्वारे मानाची पैठणी आणि इतर अनेक बक्षीसे जिंकण्याची विशेष संधी उपलब्ध असणार आहे.
याच सोहळ्यात पूर्वआयोजित ‘गौरी सजावट स्पर्धा’ आणि ‘बाप्पा रील स्पर्धा’ या दोन्ही स्पर्धांचा भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
या रंगतदार आणि आनंददायी सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी फलटण शहरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन गानबोटे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
Back to top button
