फलटण:– गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण’, ‘लायन्स क्लब फलटण’, ‘माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण’, ‘गगनगिरी ज्वेलर्स’ आणि ‘इंद्राक्षी कलेक्शन फलटण’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी दि १८ रोजी भव्य ‘गौरी सजावट स्पर्धा’ आणि ‘बाप्पा विथ रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र आणि हमखास बक्षीस दिले जाणार असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख गुरुवार दि १७ सप्टेंबर आहे.
गौरी सजावट स्पर्धा केवळ फलटण शहर व परिसरासाठी असून गगनगिरी ज्वेलर्स तर्फे प्रथम क्रमांकास – फॉर्मिंग नेकलेस, द्वितीय – बाजूबंद, तृतीय – मोती हार, चतुर्थ – आकर्षक देव मूर्ती, पाचवा – गिफ्ट हॅम्पर बक्षिसे देण्यात येणार आहेत.या स्पर्धेसाठी देखावे पौराणिक, ऐतिहासिक, पारंपरिक, समाज प्रबोधनपर किंवा इको-फ्रेंडली असावेत. घरी येऊन परीक्षण केले जाणार आहे.
बाप्पा विथ रील स्पर्धा सर्व जिल्ह्यासाठी खुली असून गगनगिरी ज्वेलर्स तर्फे प्रथम क्रमांकास – फॉर्मिंग नेकलेस, द्वितीय – पैठणी, तृतीय – देव मूर्ती, चतुर्थ – आकर्षक गिफ्ट हॅम्पर, पाचवे – भेट वस्तू अशी बक्षिसे दिली जाणार आहेत
या स्पर्धेसाठी व्हिडिओ ३० ते ६० सेकंदांचा एचडी मोडमध्ये असावा. भक्तिभाव, धार्मिक किंवा समाज प्रबोधनपर विषयांवर आधारित असावा. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) निर्मित व्हिडिओ चालणार नाही.
स्पर्धेसाठी प्रवेश फी: ₹ १५० प्रत्येकी स्वतंत्र असणार आहे.
स्पर्धेसाठी असिफा शिकलगार: 8010239062
नंदा बोराटे: 9766000320
रुपाली कचरे : 9226720881
प्रिया सस्ते: 9284274913
नीता दोशी: 9420999917
मनीषा घडिया: 7020467682
सुवर्णा शिंदे: 7498618183
उज्वला गोरे: 8484033142
अनुराधा रणवरे: 8668336313 यांच्याशी संपर्क साधावा.
महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Back to top button
