स्थानिक

शिक्षकांच्या हक्क आणि सन्मानासाठी प्रा. डॉ. सौ. वैशाली शिंदे  निवडणूक रिंगणात; पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात प्रचार सुरु 

फलटण – पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ २०२६ च्या निवडणुकीसाठी उमेदवार प्रा. डॉ. सौ. वैशाली शिंदे (एम.ए., बी.एड., पीएच.डी.) यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि हक्कांवर आधारित आपला अभ्यासपूर्ण जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

“विधान परिषदेत शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी अभ्यासपूर्ण व मुद्देसूद लढा देणे हेच माझे ध्येय आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून शिक्षकांमधून आपणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

​जाहीरनाम्यातील प्रमुख मागण्या व मुद्दे:

​जुनी पेन्शन योजना (OPS) तात्काळ लागू करणे: २००५ नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना NPS/DCPS रद्द करून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे.

​TET सक्तीचा अन्याय रद्द करणे: सेवेत कार्यरत शिक्षकांना TET च्या सक्तीतून पूर्ण सूट देऊन, हा नियम फक्त नवीन भरतीसाठीच लागू ठेवणे.

​अशैक्षणिक कामांतून मुक्ती: BLO, जनगणना, निवडणूक duty आणि पोषण आहार हिशेब यांसारख्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करून फक्त अध्यापनाचे काम ठेवणे.

​१००% विनाअट अनुदान: विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे ‘टप्पा अनुदान’ बंद करून सरसकट १००% अनुदान देणे.

​संच मान्यता २०२४-२५ रद्द करणे: पटसंख्येचे जाचक निकष आणि शिक्षक कपात धोरण रद्द करून योग्य विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर राखणे.

​शाळा व वाढीव पदांना मान्यता: २०१२ नंतरच्या शाळा/टुकड्या आणि २००३ ते २०१८ च्या वाढीव पदांना वेतन अनुदान देणे.

​१००% पारदर्शक कायम भरती: माध्यमिक व उच्च माध्यमिक रिक्त पदे भरणे, कंत्राटी पद्धत बंद करून शिपाई व लिपिक पदे कायम करणे.

​वेतन व प्रशासकीय त्रुटी निवारण: दरमहा १ तारखेला वेतन देणे, शालार्थ ID व सेवा पुस्तकाचे काम वेळेत पूर्ण करणे आणि अनुकंपा भरती तात्काळ राबवणे.

​आश्वासित प्रगती व ८ वा वेतन आयोग: शिक्षकांसाठी १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना पूर्ववत सुरू करणे व ८ व्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करणे.

​महिला शिक्षिकांची सुरक्षा व हक्क: विशाखा व ICC समितीची कडक अंमलबजावणी, प्रसूती व CCL रजांचे सुलभीकरण, स्वतंत्र स्वच्छतागृहे व पारदर्शक ऑनलाईन बदल्या.

​मतदानाचा अधिकार विस्तार: पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा कायदेशीर अधिकार मिळवून देणे.

​CHB व खासगी शिक्षकांचे संरक्षण: तासिका तत्त्वावरील (CHB) शिक्षकांना सन्मानजनक मानधन व खासगी शाळांतील शिक्षकांना सेवा संरक्षण देणे.

​शिक्षकांचे हक्क आणि सन्मान जपण्यासाठी पहिल्या पसंतीचे मतदान देऊन विधान परिषदेत पाठवण्याचे आवाहन प्रा. डॉ. सौ. वैशाली शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button