Uncategorized

रत्नागिरीत माऊली फाउंडेशनच्यावतीने मोफत जयपूर फूट शिबिर संपन्न; ६३ दिव्यांग बांधवांचा सहभाग

रत्नागिरी— गरजू व दिव्यांग बांधवांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करण्याच्या उद्देशाने माऊली फाउंडेशन, काळंबादेवी–मुंबई यांच्यावतीने आयोजित मोफत जयपूर फूट शिबिर रविवारी, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात एकूण ६३ दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला.

या शिबिराचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय विनोद जाधव, न्यायाधीश माननीय  कपाडिया, रत्नागिरी जिल्हा बारचे अध्यक्ष  पाटणे, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शिंगन, कार्याध्यक्ष अॅड. विश्वनाथ टाळकुटे, उपाध्यक्ष  रमेश लांबे, सहसचिव  संतोष गुजर, विश्वस्त  राजेंद्र फडतरे,  दिगंबर मेस्त्री तसेच देसाई हायस्कूलच्या प्राचार्य सौ. अंजली पिळणकर, श्री. महेश आळंदकर यांच्या उपस्थितीत झाले. 

याप्रसंगी जेष्ठ वकील  भाई गवाणकर, अॅड. राकेश भाटकर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात सहभागी दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम पाय व कॅलिपरसाठी आवश्यक तपासणी, मोजमाप आणि प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. येत्या चार आठवड्यांच्या कालावधीत रत्नागिरी येथे पुन्हा विशेष कार्यक्रम आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार जयपूर फूट व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. जयपूर फूट हा दिव्यांग व्यक्तींना पुन्हा चालण्याची क्षमता देणारा कृत्रिम पाय असून, अशा शिबिरांमध्ये लाभार्थ्यांचे माप घेऊन आवश्यक उपकरण विनामूल्य देण्यात येते.

या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना केवळ भौतिक मदत नव्हे, तर आत्मविश्वासाने व सन्मानाने जीवन जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे माऊली फाउंडेशनकडून सांगण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी  प्रशांत बगाडे , दत्ता नलावडे ,  नितीन इंगळे,  अभिजीत माळवदे ,अँड. महेश भोसले , अँड शिवाजी कोकरे , मनीषा माने ,  अर्जुन पिष्टे ,  हरेश्वर रानडे ,  रमेश जाधव, सौ. मंगला पाटील,  प्रशांत धनवडे,  तात्या गायकवाड , श्रेया रणवरे , श्रीकृष्ण पळसे , सौ. पूनम जाधव, तसेच माऊली फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, शिबिर समन्वयक, वैद्यकीय सहकारी, स्वयंसेवक, देसाई हायस्कूलचे व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे शिबीर यशस्वी झाले. तसेच हे शिबीर यशस्वी करण्यास मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.“माणुसकी जपूया, सेवेतून समाज घडवूया,” या भावनेतून भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील असे विश्वनाथ टाळकुटे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button