फलटण; फलटणच्या वैभवात मोठी भर पडणारा महाराणी सईबाई राणीसाहेबांचा’ पुतळा पहिल्यांदाच उभारण्याचा एक ऐतिहासिक निर्णय फलटण नगरपालिकेच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

फलटण नगर परिषदेच्या विशेष आढावा बैठकीमध्ये फलटणच्या ऐतिहासिक वैभवात भर पाडण्यासाठी नगरपरिषदेच्या आवारात महाराणी सईबाई राणीसाहेब यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याचे ठरलेले असून, शहरांतर्गत उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा या सर्व पुतळ्यांच्या उभारणीचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) आर्किटेक्ट रोहन बळीप यांनी यावेळी सादर केले.
यावेळी माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर,भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button
