फलटण -बुधवार दि २२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही काळ फलटण दौऱ्यावर येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालखी सोहळ्यासाठी जाणार असून जाता जाता ते फलटणमध्ये निंभोरे हद्दीतील प्राईड इलाईट हॉटेलवर काही वेळ थांबणार असल्याचे समजते . यावेळी स्थानिक नेते मंडळींशी ते चर्चा करणार आहेत उद्या दिनांक 22 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचा वाढदिवस पण असल्याने त्यांना वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा यावेळी देण्यात येणार आहेत. अद्याप अधिकृत दौऱ्याची पुष्टी झालेली नाही.