स्थानिक

रक्षक रयतेचा दिवाळी अंकाचे प. पु. राजनकाका देशमुख महाराज यांच्या हस्ते पूजन

फलटण – रक्षक रयतेचा या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकातील पहिल्या अंकाचे पूजन अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असलेले परमपूज्य राजनकाका देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यात्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आमचे मार्गदर्शक व ज्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने रक्षक रयतेचा न्यूज हे वृत्तपत्र चालू केले त्या रक्षक रयतेचा दिवाळी अंकाचे पूजन आदरणीय प. पु.राजनकाका देशमुख महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संपादक नसीर शिकलगार,राहुलभैय्या देशमुख, प्रशांत धनवडे,अमोल दोशी, तात्या गायकवाड आदी उपस्थित होते.

राजनकाकांनी दिवाळी अंकाचे पूर्ण अवलोकन करून दर्जेदार आणि वाचनीय अंक दिल्याचे गौरोदगार काढले.सर्वाना त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button