स्थानिक

फलटण येथील श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरात वटपौर्णिमेची जय्यत तयारी; माता-भगिनींना पूजेसाठी अगत्याचे आमंत्रण!

फलटण -फलटण येथील श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरात वटपौर्णिमेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.माता-भगिनींना पूजेसाठी अगत्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद नगर येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर परिसरात वटपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने अत्यंत देखणी आणि भाविकांचे मन वेधून घेणारी तयारी करण्यात आली आहे.

​या मंगलमयी सणाचे औचित्य साधून मंदिर प्रशासनातर्फे परिसरातील वडाच्या झाडाला एक सुंदर आणि आकर्षक पार (ओटा) तयार करून घेण्यात आला आहे. यामुळे माता-भगिनींना अत्यंत सोयीस्कर आणि प्रसन्न वातावरणात पूजा करता येणार आहे.मंदिर प्रशासनाने विशेष मेहनत घेऊन संपूर्ण मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटका आणि नयनरम्य केला आहे. वडाच्या झाडाभोवती बनवलेला नवा पार महिला भाविकांसाठी पूजेचा आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे .

श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर प्रशासनातर्फे सर्व माता-भगिनींना नम्र विनंती करण्यात आली आहे की, वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी वडाची मनोभावे पूजा करण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मंदिरामध्ये अवश्य यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button