स्थानिक

फलटणकरांसाठी गूड न्यूज! शहरांतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा भव्य निधी मंजूर; नितीन गडकरींचा मोठा निर्णय

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

​फलटण -फलटण शहरातील खड्डे आणि खराब रस्त्यांच्या समस्येतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. शहरांतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ७० कोटी रुपयांचा भरीव निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण भेटीला मोठे यश आले आहे.

​या बैठकीत फलटण शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली होती. यावर तात्काळ निर्णय घेत ना. गडकरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता हा निधी मंजूर केला. तसेच, येत्या सहा महिन्यांत सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या निधीतून फलटण शहरातील सर्व प्रमुख रस्ते आता उच्च दर्जाचे आणि काँक्रिटचे बनवले जाणार आहेत, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतील.

फलटणच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यशैलीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष कौतुक केले.

माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडणार असून, नागरिकांना खड्डेमुक्त आणि प्रशस्त रस्त्यांचा प्रवास अनुभवता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button