स्थानिक

भक्तिमय वातावरणात रंगला निंबोडी जिल्हा परिषद शाळेचा पालखी सोहळा, बाल वारकऱ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

लोणंद – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोडीचा(खंडाळा )पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. माऊली नामाचा गजर, भगव्या पताका आणि चिमुकल्यांचा उत्साह यामुळे निंबोडी विठुरायाच्या रंगात न्हाऊन निघाली.

       फुलांच्या सुंदर माळांनी सजलेल्या पालखीचे भावपूर्ण पूजन शाळा व्यवस्थापन सदस्य अधिक शेळके यांच्या हस्ते होऊन वारीचे प्रस्थान झाले.

     या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पारंपारिक वेशभूषा ! हातात लहान लहान टाळ,खांद्यावर फडकणाऱ्या भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले हे बाल गोपाळ प्रत्यक्ष पंढरीचे वारकरी भासत होते. बालचमूने साकारलेले हुबेहूब विठ्ठल रुक्मिणीचे रूप, कपाळावरील गोपी चंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावरील निष्पाप भक्ती पाहून निंबोडी करांचे डोळे सुखावले. पालखी प्रदक्षिणा दरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी दिंडीचे मनोभावे पूजन केले. या दरम्यान पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात महिला पालकांनीही रिंगणात उतरून फेर धरला आणि पारंपारिक फुगड्या घालत वारीचा आनंद घेतला.

 

      दींडी सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नंदकुमार शेळके, सुनील शेळके यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.

     पुस्तकी ज्ञाना पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांवर उच्च नैतिक संस्कार व्हावेत, त्यांना महाराष्ट्राच्या उच्च वारकरी संस्कृतीची ओळख व्हावी या उदात्त हेतूने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे सरपंच बाळासाहेब शेळके, माजी सरपंच भाऊसाहेब शेळके, सोपानराव शेळके, धनाजी शेळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत शेळके, उपाध्यक्ष सुनिता बोडरे, सदस्य बाळासाहेब शेळके, रमेश डोईफोडे, ज्योती खरात, सीमा कोळेकर, शंकर धायगुडे, जयश्री शेळके, अर्चना शेळके, पालक, ग्रामस्थ आदींनी कौतुक केले.

    या सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका हसीना पटेल, नवनाथ शिंदे, इम्तियाज तांबोळी, मोहन जाधव, गिरीश धायगुडे, पुष्पा धायगुडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button