फलटण – फलटण येथे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य, माळजाई मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व उघडा मारुती देवस्थानचे अध्यक्ष स्व. जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माळजाई मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
लायन मनुभाई पटेल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात स्व. मिस्त्री यांच्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, लायन्सचे माजी प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर, द्वितीय प्रांतपाल मंगेश दोशी, लायन्स झोन चेअरमन सौ. संध्या गायकवाड, जीवन माधवराव शिंदे आणि निवृत्त प्राचार्य सुधीर इंगळे यांनी स्व. गरवालिया यांच्या कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी बाहेरगावी असल्याने ध्वनिमुद्रित संदेशाद्वारे स्व. मिस्त्री यांच्याशी असलेल्या सुमारे ५० वर्षांच्या ऋणानुबंधांना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेला लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष रणजित बर्गे, सचिव प्रमोद निंबाळकर, ट्रेझरर दिलीप शिंदे, चंद्रकांत कदम, रतनशीभाई पटेल, ॲड. शैलेंद्र शहा, डॉ. कांतीलाल गांधी, डॉ. अशोक व्होरा, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी, गरवालिया कुटुंबीय (राजूशेठ, महेशशेठ गरवालिया व कुटुंब), नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. जे. एच. गरवालिया यांनी विविध संस्थांच्या उभारणीसाठी व समाजसेवेसाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.