स्थानिक
जिद्द आणि अथक परिश्रमच्या जोरावर डॉ. प्रज्ञा प्रवीण आगवणे हिला पोस्ट ग्रॅज्युएट साठी अग्रगण्य वैद्यकीय कॉलेजमध्ये मिळाला प्रवेश

फलटण – फलटण मधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रविण आगवणे व त्वचारोग व कॉस्मेटिक स्पेशालिस्ट डॉ. सौ दीपा आगवणे गेली 28 वर्षे तुलसी अॅक्सिडेंट व जनरल हॉस्पिटल या माध्यमातून फलटण व आसपास परिसरातील रुग्णसेवा करीत आहोत.याच वैद्यकीय व रुग्णसेवेचा वारसा आता त्यांची पुढील पिढी चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.यामध्ये नुकतेच कन्या डॉ.प्रज्ञा ला postgraduate शिक्षणासाठी *M.D.PATHOLOGY* या FACULTY मध्ये….महाराष्ट्रातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालय….*MAHATAMA GANDHI MEDICAL MISSIONS MEDICAL COLLEGE, NAVI MUMBAI* येथे गुणवत्तेवर प्रवेश मिळाला ही सर्वासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

पुढील करियर रिसर्च मध्ये करण्याचा मानस डॉ.प्रज्ञा यांनी व्यक्त केला……तिचे M.B.B.S. चे प्रशिक्षण *Maharashtra University of Health Sciences* हे *Distinction,* मध्ये झाले आहे.त्याबरोबरच त्यांचा दुसरा मुलगा हर्षवर्धन प्रविण आगवणे हा सुद्धा M.B.B.S. च्या तिसर्या वर्षात शिक्षण घेत आहे.या यशाबद्दल मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सौ.जिजामाला नाईक निंबाळकर , आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर,सौ.मनीषाताई नाईक निंबाळकर, युवा नेते स्वराज नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




