फलटण – सौं शैनाजबी रफिक मुलाणी यांची मलवडी {तालुका माण जिल्हा सातारा} येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा फलटण शहरातील मुस्लिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जमशेद पठाण, सामाजिक कार्यकर्ते हैदर मेटकरी, मुबारकभाई इनामदार यानी मलवडी या गावी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केला आणि वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौं शैनाजबी यांचे पती रफिकभाई मुलाणी अजित पवार गटाचे कट्टर समर्थक असून गेले 25 ते 30 वर्ष राजकारण व सामाजिक कार्यातून आपली चांगली प्रतिमा निर्माण केले जिल्हा परिषद सदस्य अनिलभाऊ देसाई यांचे ते निकटवर्तीय मांनले जातात राजकारणा पलीकडे जाऊन समाजकार्याची जास्त आवड असून त्या माध्यमातून ते आजपर्यंत गावाचा विकास करत आलेले आहेत प्रत्येकाची अडीअडचणी सोडवणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे च्या कार्याची लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे त्यामुळे गेले चार टर्म ते प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडून येतात यावेळी त्यांची पत्नी शैनाजबी रफिक मुलाणी यांना उपसरपंच पद मिळाले आहे.