स्थानिक

पिंपरी चिंचवड, शनि मंदिराजवळ महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

पुणे -पिंपरी चिंचवड शहरातील मुंबईकडे जाणाऱ्या हायवे लेनवर शनि मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने छोट्या वाहनांचे इंजिन बंद पडत असून अनेक वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहनांची सततची गर्दी वाढल्याने काही वाहने डिव्हायडरच्या बाजूने मार्ग काढत असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम निर्माण झाला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

घटनास्थळी PSI धोत्रे  व पोलिस कर्मचारी तात्काळ दाखल झाले असून पोलिस स्वतः पाण्यात उतरून वाहने बाहेर काढण्याचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील पाणी निचरा व्यवस्था स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी NHAI प्रशासनाची असून संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. नागरिकांनी तातडीने पाणी निचरा व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button