स्थानिक

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश!

फलटण : औषध निर्माण क्षेत्रात दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेज, फलटण येथील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्तेची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) तर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ च्या वार्षिक निकालात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत चमकदार कामगिरी केली आहे.

​महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा एकूण निकाल ९४.९५% तर द्वितीय वर्षाचा निकाल ८५.८४% इतका लागला आहे.

​गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे:

​प्रथम वर्ष डी. फार्मसी (First Year D.Pharm):

​प्रथम क्रमांक: कु. तन्मय राजेंद्र बरडे — ८५.४०%

​द्वितीय क्रमांक: कु. नौशिन नसीर शिकलगार — ८०.२०%

​तृतीय क्रमांक: कु. श्रेया दत्तात्रय मदने — ७९.३०%

​द्वितीय वर्ष डी. फार्मसी (Second Year D.Pharm):

​प्रथम क्रमांक: कु. मैत्रेयी बापुराव साळुंखे — ८३.७३%

​द्वितीय क्रमांक: कु. प्रतिक्षा तात्याबा दडस — ७९.६४%

​तृतीय क्रमांक: कु. समृद्धी कुंदन संकपाळ — ७७.५५%

​विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव  डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य  महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाच्या सदस्या  सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके) तसेच सर्व नियामक मंडळ सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य  एम. एन. फडतरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button