स्थानिक

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश! फलटणमध्ये सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन बागवान यांच्याकडून वारकऱ्यांना बिस्कीट पुड्यांचे वाटप

फलटण:—-श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण नगरीत आगमन होत असताना, येथे सामाजिक ऐक्याचे एक अत्यंत सुंदर चित्र पाहायला मिळाले. फलटणमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन बागवान यांच्या वतीने शंकर मार्केट येथे पालखी सोहळ्यातील भाविक आणि वारकऱ्यांसाठी बिस्किटांचे वाटप करण्यात आले. कोणत्याही जाती-पातीचा विचार न करता, केवळ सेवाभाव मनात ठेवून त्यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबवत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक आदर्श संदेश समाजाला दिला आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या वारकऱ्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानून ताजुद्दीन बागवान यांनी या सेवायज्ञाचे आयोजन केले होते. त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे परिसरातून आणि वारकऱ्यांमधून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी पत्रकार नसीर शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे, मोहनराव पोतेकर, जमशेद पठाण यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप केले.
“जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करणे आणि वारकऱ्यांची सेवा करणे हीच खरी संतांची शिकवण आहे. हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button