फलटण:– संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने फलटण येथे ‘डराडो’ (DARADO NGO) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. “वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा” हा भाव मनी ठेवून संस्थेच्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत हा सेवा उपक्रम अविरतपणे सुरू होता. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’ या अखंड जयघोषात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या अन्नदान व सेवा उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक हातभार लावणाऱ्या सर्व देणगीदारांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. संस्थेचे विश्वस्त डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात व ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी सर्व देणगीदार, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रत्येक हाताचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डराडो संस्थेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:फुले, श्रीमती शिंदे, नाळे, शिंदे, सोनावणे बंधूअडसूळ, सनी, पारसे, खरात, कणसेया सर्व स्वयंसेवकांनी दिवसभर निस्वार्थ भावनेने वारकऱ्यांची सेवा केली. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच हा सोहळा उत्साहात पार पडला.
Back to top button
