स्थानिक

फलटण शहरात काही अकॅडमी चालक विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असूनही बिनदिक्कतपणे अकॅडमी चालवीत असल्याने खळबळ, काही जणांकडून शिक्षणाचा काळाबाजार

भाग १

फलटण (नसीर शिकलगार ) — फलटण शहरात काही अकॅडमी चालक विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असूनही बिनदिक्कतपणे अकॅडमी चालवीत असल्याने खळबळ, काही जणांकडून शिक्षणाचा काळाबाजार सुरू आहे प्रशासन मात्र आंधळेपणाचे आणि बहिरेपणाचे सोंग घेत आहे.

 फलटण शहर व तालुक्यात नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या अकॅडमींवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली असून, पालकांच्या अंधश्रद्धेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. फलटण शहरात अनेक अकॅडमी चालक विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असूनही बिनदिक्कतपणे वर्ग चालवत आहे. पालक कोणतीही शहानिशा न करता पाल्यांना प्रवेश देत असल्याने या चालकांचे चांगलेच फावत आहे.

 अनेक अकॅडमी चालकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही ते राजरोसपणे शिक्षण व्यवसाय चालवत आहेत. पालक वर्गाला शिक्षकांवर गुन्हे दाखल आहेत हे माहिती असून सुद्धा ते आपली मुले त्या अकॅडमी मध्ये पाठवत आहेत. हे विशेष आहे. काही अकॅडमीचालक प्रामाणिकपणे अकॅडमी चालवत आहे मात्र काहीजण निव्वळ पैसे कमवण्यासाठी शिक्षणाचा बाजार मांडत आहेत. 

अनेक अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत काहींनी तर फी भरली नाही म्हणून विद्यार्थी व पालक यांना शिवीगाळ केल्याचे सुद्धा किस्से ऐकवीत आहेत.

 सुरक्षा मानके, अग्निशमन नियम आणि प्रशासकीय परवानग्यांकडे दुर्लक्ष करून नियम डावलले जात आहेत. यावर नगरपालिका प्रशासनआणि शिक्षण विभाग मात्र कसलीच कारवाई न करता डोळ्यावर आंधळे पणाची पट्टी बांधत आहे प्रवेश घेताना अकॅडमीची कायदेशीर वैधता, शिक्षकांची पात्रता आणि पूर्वइतिहास तपासण्याची तसदी पालक घेत नाहीत.हे दुर्दैव आहे.

 अशा अनधिकृत आणि विनापरवाना अकॅडमींमुळे विद्यार्थ्यांचे करिअर आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका अकॅडमी मधील शिक्षक महिलेने नववी दहावीच्या मुलांना पाचवीतील मुलाला मारहाण करायला लावली होती. त्या मुलांवर पोलिसात गुन्हे दाखल झाल्याने या मुलांचे भवितव्य आधांतरी झाली आहे. त्यांना भविष्यात नोकऱ्या मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे पालकांनी सुद्धा योग्य अकॅडमीची निवड करणे गरजेचे आहे.

क्रमशः  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button