स्थानिक

फरांदवाडी येथे कृषिका ड्रोन सर्व्हिसेस शाखेचे १० जुलै रोजी उद्घाटन 

 फलटण : – आधुनिक शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अॅग्रोनॉमिक्स AI अॅग्रीकल्चर सुविधा केंद्राच्या अंतर्गत कृषिका ड्रोन सर्व्हिसेसच्या फरांदवाडी शाखेचे उद्घाटन शुक्रवार दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक म्हणून मा. राजेंद्रदादा पवार (चेअरमन, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. के. एम. मोमीन (उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण), मा.  डी. एस. गायकवाड (तालुका कृषी अधिकारी, फलटण), मा. प्रविण गायकवाड (सीआर लीडर, कमिन्स मेगासाईट, फलटण) तसेच मा.  अभिषेक काळेल (प्रोग्राम कोऑर्डिनेटर, सेल्को फाउंडेशन, बेंगळुरू) उपस्थित राहणार आहेत.

शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पीक फवारणी, पीक निरीक्षण, खत व औषध व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक सेवांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. परिसरातील शेतकरी, कृषीप्रेमी नागरिक व मान्यवरांनी या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक  हर्ष भोसले व मित्र परिवार यांनी केले आहे.स्थळ : मु.पो. ताममळा, फरांदवाडी, ता. फलटण, जि. सातारा{संपर्क : ९७६५१४०२७८}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button