फलटण – -साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया प्रा. लि. च्या सन २०२६-२७ च्या ८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असून, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, फलटण तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजन करण्यात आले.
यावेळी श्री दत्त इंडिया समूहाचे संचालक जितेंद्र धारू, प्रिती रुपारेल, करण रुपारेल, परिक्षीत रुपारेल, चेतन धारू, व्हा. प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे, प्रशासन अधिकारी अजितराव जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले, व्हा. प्रेसिडेंट भारत तावरे, चांगदेव साळवी, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, केन मॅनेजर सदानंद पाटील, दिगंबर माने, रमेश बागणवर, एचआर संजय भुसनार, नितीन नाईकनवरे, डीजीएम अजित कदम, डेप्युटी चीफ इंजिनिअर किशोर फडतरे, नितीन रणवरे, विशाल साखरे, नितीन होले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, पै. संतोष भोसले, पै. महेश भोसले, राजेंद्र गायकवाड, केन यार्ड इन्चार्ज एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सुरक्षा अधिकारी अजय कदम, सुरेश नाना भोसले, संजय जाधव, मातोश्री कंस्ट्रक्शनचे संजय भोसले, जयराम नाना भोसले, सुरेश भोसले, तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.