स्थानिक

फलटण शहरात स्वामी विवेकानंदनगर भागात पाणीबाणी,तीन दिवस झाले पाणीच नाही, नागरिकांना पावसाच्या पाण्यावर गुजराण करण्याची प्रथमच वेळ, नगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

फलटण – फलटण शहरातील स्वामी विवेकानंदनगर भागातील पाणीबाणी अधिकच पेटली असून, सलग तिसऱ्या दिवशीही थेंबभर पाणी न मिळाल्याने नागरिक संतप्त  झाले आहेत. प्रशासनाकडे तक्रार करून पण कसलीच दखल घेतली जात नसल्याने पावसाचे पाणी भांड्यांमध्ये जमा करून घरगुती कामांसाठी वापरण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. पावसाच्या पाण्यावर गुजराण करण्याची नामुष्की नागरिकांवर प्रथमच आली आहे.

  

 गेल्या तीन दिवसापासून फलटण शहरातील स्वामी विवेकानंद नगर भागात नळाला पाणी आलेले नाही. पाणी नसल्यामुळे नागरिकांच्या प्रचंड हाल होत आहेत. फलटण नगरपालिका प्रशासनाला कळविले तरी काहीच दखल घेतली जात नाही. तुम्हाला पाणी सोडले आहे नळाला का पाणी आले नाही हे तुम्हीच बघा अशी थातूर मातूर उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

फलटण शहराला दिवसाआड पाणी देण्याचा दावा करणाऱ्या पालिकेचे या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तीन दिवस पाणी नसल्याने अखेर नागरिकांनी पावसाचे पाणी भांड्यांमध्ये जमा करून घरगुती कामांसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या पाण्यावर गुजराण करण्याची वेळ नागरिकांवर प्रथमच आली आहे अनेकांच्या घरात पिण्यासाठीही पाणी शिल्लक नाही. नगरपालिकेत वारंवार तक्रारी करूनही अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत, प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई होत नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. पाण्यासंदर्भात फोन केला तरी फोन उचलला जात नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.

 घरात आंघोळीला पाणी नसल्यामुळे अनेकांनी मुलांना शाळेत सुद्धा पाठविलेलं नाही. अशी वेळ प्रथमच आली आहे  

  • आज तिसऱ्या दिवशी तरी पाणी येईल अशी अपेक्षांनी नागरिक नळाकडे डोळे लावून बसले होते मात्र थेंबभर पण पाणी आले नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची पण वेळ नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button