स्थानिक

कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा तृतीय स्मृतिदिन यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये विविध कार्यक्रमांनी संपन्न….

फलटण – श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते  कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा तृतीय स्मृतिदिन यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.

आज शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा तृतीय स्मृतिदिन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. 

प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष  सी. एल. पवार , संस्थेचे मानद सचिव  डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके),  शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या  सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके), सदस्य  प्रकाश तारळकर ,माजी प्राचार्य  आप्पा शिंदे यांच्या हस्ते कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका* यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रा  यादव एस.डी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू व उद्देश उपस्थितांना सांगितला.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अलौकिक यशामध्ये ज्यांनी खारीचा वाटा उचलला व आपल्या ज्ञानदानाने विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवले. सेवानिवृत्त गुरुजनांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीराम एज्युकेशन सोसायटीने आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा केलेला सत्कार हा अविस्मरणीय असून आम्ही संस्थेच्या ऋणात सदैव राहू असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षकांनी याप्रसंगी काढले. 

त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा,बी.ए.भाग तीन, बी.कॉम.भाग तीन, डी फार्मसी कॉलेज, माध्यमिक स्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.

दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत *कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका* यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमध्ये राबविण्यात आलेल्या *वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक* मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

संस्थेचे मानद सचिव  डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून आदरणीय काकांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत असताना संस्थेच्या वाटचालीविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती सांगितली. आदरणीय काकांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त* विविध शाखांमध्ये राबविण्यात आलेल्या क्रीडा व विविध स्पर्धा याविषयी त्यांनी कौतुक केले व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज AI प्रशिक्षणाची नितांत गरज आहे आणि *स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला सज्ज ठेवले पाहिजे.प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार करण्याची संधी आम्हास मिळावी असे अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केली.

सर्व मान्यवर, सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू , पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना संस्थेच्या वतीने स्वादिष्ट जेवण देण्यात आले.

या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड एन.एम., उपप्राचार्य  घनवट पी.डी., सर्व विभाग प्रमुख यांनी केले. कला शिक्षिका सौ ढेंबरे डी.पी.  यांनी कार्यक्रमाचे उत्तम फलक लेखन केले.

या कार्यक्रमाकरिता संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

या स्मृतिदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.  यादव एस.डी. ,सौ. तगारे एस. एम., क्रीडा शिक्षक  माने डी आर. यांनी केले तर आभार सौ.पवार एस. आर. यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button