स्थानिक

फलटण पंचायत समितीमध्ये कोणालाच एकहाती सत्ता नाही , सत्तेचा कौल आता ईश्वर चिठ्ठीवर, पंचायत समितीत दोन्ही पक्षांना समान जागा

फलटण – फलटण पंचायत समिती निवडणूक मध्ये मतदारांनी दोन्ही पक्षांना समान कौल दिला आहे. दोन्ही बाजूच्या प्रत्येकी आठ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती चिठ्ठीवर निवडला जाणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला ५ तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत.

फलटण पंचायत समिती निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने 72 टक्के मतदान झाले होते. दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यामध्ये त्यामध्ये आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती असा थेट सामना रंगला होता आज फलटण येथील शासकीय गोदामामध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली अत्यंत चुरस काही गटामध्ये पहावयास मिळाली अनेक उमेदवार अल्पमताने निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी 5 जागा शिवसेना राजे गट, 3 जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती यांना मिळाल्या आहेत त्यामध्ये भाजपाला वाठार निंबाळकर, हिंगणगाव गट तर राष्ट्रवादी काँग्रेसला गुनवरे गटात विजय मिळाला आहे. शिवसेनेला तरडगाव साखरवाडी विडणी बरड कोळकी या ठिकाणी विजय मिळाला आहे.

 पंचायत समितीच्या 16 पैकी 8 जागा शिवसेनेला तर 8 जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये शिवसेनेला जाधववाडी, पाडेगाव,तरडगाव दुधेबावी, सासवड, बरड,सस्तेवाडी,सांगवी या गणात भाजपला सुरवडी, कोळकी, वाठार निंबाळकर, विडणी,हिंगणगाव या गणात तर राष्ट्रवादी काँग्रेसला साखरवाडी, आसू, गुणवरे या गणात विजय मिळाला आहे.

 पंचायत समितीमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी आठ जागा मिळाल्याने आता सत्ता कोण स्थापन करणार याकडे लक्ष लागले आहे या सत्तेचा निकाल चिट्टीवर होण्याची शक्यता आहे. पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षांना समान संधी दिल्याने आता सदस्यांची काम करताना कसोटी लागणार आहे. काही मतदारसंघाची फेर मतमोजणी मागणी केल्याने घेण्यात आली मात्र त्यामध्ये निकाल बदलला गेला नाही.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे

१) तरडगाव / नागरिकांचा मागास प्रवर्ग 

गिरीश सुदाम बनकर (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

सूर्यकांत कृष्णा खरात (भाजपा) – पराभूत

२) साखरवाडी-पिंपळवाडी/ अनुसूचित जाती महिला प्रवर्ग 

रुपाली लक्ष्मण सरगर (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

कांबळे संचिता सागर (भाजपा) – पराभूत 

३)विडणी / अनुसूचित जाती महिला प्रवर्ग 

ज्योती गौतम मोरे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी 

सुषमा अविनाश मोरे (राष्ट्रवादी अजित पवार) – पराभूत

४)गुणवरे / अनुसूचित जाती महिला प्रवर्ग 

जगताप हेमलता अनिल (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी 

५)बरड / अनुसूचित जाती प्रवर्ग 

वैशाली संदीप कांबळे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

भाऊसाहेब पोपट मोरे (भाजपा) – पराभूत 

६)कोळकी / सर्वसाधारण प्रवर्ग

सह्याद्री सूर्याजीराव कदम (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

जयकुमार अरविंद शिंदे (भाजपा) – पराभूत 

७)वाठार (निंबाळकर) / नागरिकांचा मागास प्रवर्ग 

निलेश बापुराव लोखंडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

विष्णु किसन लोखंडे (भाजपा) – विजयी

८)हिंगणगाव / सर्वसाधारण महिला प्रवर्ग 

सारिका धैर्यशील ऊर्फ दत्ताबापु अनपट (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

किरण निलेश नलवडे (भाजपा) – विजयी 

एकूण ८ पैकी

भाजपा – २

राष्ट्रवादी अजित पवार – १

शिवसेना एकनाथ शिंदे – ५

पंचायत समिती गण

१) दुधेबावी / सर्वसाधारण महिला प्रवर्ग

मनिषा लक्ष्मण सोनवलकर (भाजपा) – पराभूत

सौ.विजया हनुमंत सोनवलकर (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी 

२) कोळकी / सर्वसाधारण प्रवर्ग

अशोक गेनबा नाळे (शिवसेना एकनाथ शिंदे) -पराभूत

विकास अशोक नाळे (भाजपा) – विजयी 

३) जाधववाडी (फ) / सर्वसाधारण

अमोल दशरथ सस्ते (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

युवराज नरसिंग सस्ते (भाजपा) – पराभूत 

४) वाठार (निंबाळकर) / सर्वसाधारण महिला

स्वाती विकास तरटे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

शुभांगी तुकाराम शिंदे (भाजपा) – विजयी 

५) सुरवडी / सर्वसाधारण प्रवर्ग

किरण लक्ष्मणराव साळुंखे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

धनंजय प्रल्हादराव साळुंखे (भाजपा) – विजयी 

६) सासवड / नागरिकांचा मागास प्रवर्ग

संतोष अंकुश कारंडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

संतोष हणमंत खताळ (भाजपा) – पराभूत

७) हिंगणगाव / सर्वसाधारण महिला

सीमा शरद भोईटे-इनामदार (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

सौ.सीमा सुरेश भोईटे (भाजपा) – विजयी 

८) पाडेगाव / सर्वसाधारण प्रवर्ग

राहुल दादासो नरुटे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

अमोल बन्यासो खराडे (भाजपा) – पराभूत

९) तरडगाव / सर्वसाधारण महिला प्रवर्ग

योगिता दीपक गायकवाड (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

स्मिता प्रशांत गायकवाड (भाजपा) – पराभूत

१०) साखरवाडी-पिंपळवाडी / नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 

माडकर कमलताई शंकर (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

शिवांजली विक्रमसिंह भोसले (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी 

११) सस्तेवाडी / नागरिकांचा मागास प्रवर्ग

तांबे गणेश मल्हारी (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

विजय अप्पासो भिसे (भाजपा) – पराभूत 

१२) सांगवी / नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

सौ. सारिका संजय सोडमिसे (राष्ट्रवादी अजित पवार) – पराभूत

१३) विडणी / सर्वसाधारण प्रवर्ग

सचिन गजानन अभंग (भाजपा) – विजयी 

डॉ. किरण उत्तमराव शेंडे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत 

१४) गुणवरे / अनुसूचित जाती महिला प्रवर्ग

वैशाली अतुल कांबळे (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

वनिता धनाजी आढाव (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी 

१५) आसू / अनुसूचित जाती प्रवर्ग

भिमराव दामोदर पवार (शिवसेना एकनाथ शिंदे) – पराभूत

संजय रघुनाथ पवार (राष्ट्रवादी अजित पवार) – विजयी 

१६) बरड / सर्वसाधारण महिला प्रवर्ग

आटोळे स्वाती हणमंत (शिवसेना एकनाथ शिंदे) – विजयी

अनिता संतोष गावडे (भाजपा) – पराभूत

एकूण १६ पैकी

भाजपा – ५

राष्ट्रवादी अजित पवार – ३

शिवसेना एकनाथ शिंदे – ८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button