स्थानिक

राज्यस्तरीय भव्य सूक्ष्म लघु कथा ( सूलक )स्पर्धेत इम्तियाज तांबोळी यांचे उज्वल यश

फलटण – पहिली राज्यस्तरीय भव्य सूक्ष्म लघु कथा ( सूलक ) स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. प्रेम या विषयावर कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत इम्तियाज तांबोळी यांच्या पाठमोरी या कथेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त झाला.

   या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नवव्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. विजय काकडे होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रवींद्र पांडकर, सौ. अनला बापट, प्रकाश सस्ते, नीलांबरी गानू, डॉ. शैलजा करोडे, निखिल कोलते यांनी परिश्रम घेतले. 

    इम्तियाज तांबोळी यांच्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button