स्थानिक

गुणवरे{ता. फलटण }येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी, भगवान बुद्ध मूर्तीची विधिवत स्थापना 

पंचशील तरुण मंडळाच्या पुढाकारातून समाज प्रबोधन:

गुणवरे (प्रतिनिधी) :येथील पंचशील तरुण मंडळाच्या पुढाकारातून आढाववस्ती, येथे तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५८८ वी जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. जयंती उत्सवाचे औचित्य साधून याप्रसंगी भगवान बुद्ध मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.

तसेच स्थानिक महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि समाजप्रबोधनात्मक वातावरणात सर्व कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक जतन यांचा उत्कृष्ट संगम उपस्थितांना अनुभवायला मिळाला.

भगवान गौतम बुद्ध यांनी मानवजातीला दिलेला शांती, समता, करुणा आणि बंधुतेचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे संवर्धन आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भंतेजींच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपस्थितांनी बुद्ध वंदना करून त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले. या धार्मिक विधींमुळे परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

तत्पूर्वी, गावातून भगवान बुद्धांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. , जयभीम आणि बुद्धमय घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मिरवणुकीनंतर आढावस्ती येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि नीटनेटकी व्यवस्था यामुळे कार्यक्रमस्थळाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.

कार्यक्रमादरम्यान भंतेजींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भगवान बुद्धांच्या शिकवणीतील मध्यममार्ग, संयम, अहिंसा आणि विवेकशील जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक जीवनात बुद्ध विचार अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत उपस्थितांसाठी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. हजारो नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतला. तसेच आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक केले.

याप्रसंगी महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेला तेजस्वी प्रस्तुत विशाल आढाव यांचा खेळ रंगला पैठणीचा ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. त्यामध्ये महिलांनी आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमात वेगळी रंगत निर्माण केली. स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी साडी आणि भारतीय संविधानाची उद्देशिका देवून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक समृद्ध आणि प्रभावी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दरम्यान, लहान मुला-मुलींनीही विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत कार्यक्रमाला उत्साहाचे वेगळे स्वरूप दिले. नव्या पिढीपर्यंत बुद्ध विचार पोहोचवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. सामाजिक एकता, सांस्कृतिक जतन, महिलांचा सन्मान आणि बौद्ध विचारांचा प्रचार यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. पंचशील तरुण मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच लहान गट मुले आणि मोठा गट मुले यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामने खेळले आहेत. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले… महिलांचे इतर खेळ भरवण्यात आले होते सहभागी महिलांना त्याच वेळी महिलांना भेट वस्तू देण्यात आले 

यावेळी पंचशील तरुण मंडळ आढावस्ती येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.. त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदाने कार्यक्रमात सिंहाचा उचलला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button