स्थानिक
फलटण येथे काँग्रेस “संघटन सृजन अभियान” अंतर्गत कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार

फलटण – फलटण येथे “संघटन सृजन अभियान” अंतर्गत राष्टीय काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
सदर बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हिमाचल प्रदेश इंदोरा चे आमदार मलेंद्र राजन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजयजी बालगुडे, राजेंद्र शेलार, प्रदेश प्रतिनिधी डॉ सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका अध्यक्ष महेद्र सूर्यवंशी बेडके, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अल्ताफ पठाण, बालमुकुंद भट्टड, तालुका उपाध्यक्ष अशोकराव शिंदे युवक सेल अध्यक्ष गंगाराम रणदिवे, ताजुद्दीन बागवान ओबीसी सेल शहर अध्यक्ष विकास ननावरे,अभिजित जगताप,आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





