स्थानिक

पालखी येण्यापूर्वी शहरात उकरलेले सर्व रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा, नवीन रस्ते उकरू नका – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे आदेश

रक्षक रयतेचा न्यूजच्या वृत्ताची घेतली दखल

फलटण – फलटण शहरात सध्या सुरू असलेल्या पालखी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून एकही रस्ता पूर्ण नसताना ठेकेदार दुसरे रस्ते उकरत बसल्याने याबाबतचे वृत्त रक्षक रयतेचा न्यूजने प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेत पालखी पूर्वी पालखी मार्गावरील सर्व रस्त्याची कामे पूर्ण करा, नवीन रस्ते खोदू नका असे स्पष्ट आदेश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

  नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज त्यांच्या दालनामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे नूतन अभियंता अजय देशपांडे,पालखी मार्गाचे ठेकेदार प्रफुल्ल पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन पालखी येण्यापूर्वी सर्व रस्ते दर्जेदार करण्याचे आदेश दिले.

ठेकेदार उकरतोय नुसताच रस्ता, जनतेला बसतोय फटका, एक ना धड भराभर चिंद्या. रस्ते कामात नियोजनाचा अभाव, एकही रस्ता व्यवस्थित पूर्ण नाही असे वृत्त रक्षक रयतेचा न्यूजने दिनांक ११ में रोजी प्रसिद्ध केले होते या वृत्ताचे जनतेतून चांगले स्वागत झाले होते. जनतेला होणारा त्रास याची माहिती या वृत्तांमधून दिली गेली होती. रस्ते उकारल्यामुळे धुळीचा आणि खड्ड्यांचा मोठा त्रास जनतेला होत होता तसेच रस्ते खोदल्यामुळे व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावे लागत होते. एक रस्ता पूर्ण झाला नाही तोच दुसरीकडे रस्त्याचे खुदाई चालू होती त्यामुळे एकाही रस्त्याचे नीट काम पूर्ण झाले नव्हते. कामावर कोणाचेच नियंत्रण नव्हते.याबाबत रक्षक रयतेचा न्यूजने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते  याची दखल घेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व रस्ते दर्जेदार करण्याचे आदेश दिले. जे रस्ते उखडले आहेत त्याची कामे 100% पूर्ण करा, नवीन रस्ते उकरू नका असेही त्यांनी स्पष्टपणे बजावले. यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी रस्त्याची कामे दर्जेदार व वेळेपूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव, नगरपालिकेचे अभियंता रत्नरंजन गायकवाड, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, नगरसेवक रोहित नागटिळे, अनुप शहा, अमोल सस्ते आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button