स्थानिक
श्रीमती वनमाला श्रीकांत दोशी (गुणवरेकर) यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात पार

फलटण – आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस या उक्तीप्रमाणे श्रीमती वनमाला श्रीकांत दोशी गुणवरेकर यांनी 81 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा फलटण येथे अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला.

सहस्रचंद्र दर्शन हा केवळ आयुष्यातील एक टप्पा नसून, तो संस्कार, त्याग, ममत्व आणि आशीर्वादांनी उजळलेला एक प्रेरणादायी जीवनप्रवास असतो.
समाजात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले तसेच विविध सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यात तळमळीने सक्रिय सहभाग घेणारे हेमंत , डॉ अतुल आणि अमोल श्रीकांत दोशी, गुणवरेकर (मुंबई), नातू साजेश दोशी यांच्या व्यक्तिमत्त्वामागे श्रीमती वनमाला श्रीकांत दोशी, गुणवरेकर यांचे महान संस्कार, मायेची ऊब, त्याग आणि जीवनमूल्यांची शिकवण आहे.
याच संस्कारांच्या पवित्र छायेखाली वाढलेले हेमंत , डॉ अतुल आणि अमोल, साजेश दोशी हे आज समाजासाठी कार्यरत असून, त्यांच्या सेवाभावी आणि समाजाभिमुख कार्यामध्ये त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचे तेज स्पष्टपणे जाणवते.
घरापुरते मर्यादित न राहता समाजासाठी जगण्याची प्रेरणा, माणुसकी जपण्याची शिकवण आणि सेवेला धर्म मानण्याची भावना त्यांनी आपल्या पुत्रामध्ये रुजवली; हीच त्यांच्या मातृत्वाची खरी कमाई आहे.
एकत्र कुटुंब रुजवण्याचे काम स्व. मोतीराम नथुराम दोशी ,स्व. शांतीलाल मोतीराम. दोशी, स्व.वसुमती शांतीलाल दोशी ,स्व. सुरेश मोतीराम. दोशी, श्रीमती सरला सुरेश दोशी यांनी केली त्यांना भक्कम साथ स्व. श्रीकांत मोतीराम. दोशी ,श्रीमती वनमाला श्रीकांत दोशी व सुना सौ वैशाली, सौ सुनीता, सौ माधवी व नात सून सौ श्रद्धा यांनी दिली.श्रीमती वनमाला दोशी यांचे औक्षण सुना आणि नात सुनांनी यांनी केल. काही जणांनी त्यांचे श्रीमती वनमाला दोशी यांच्या बद्दलचे भावनिक मनोगत व्यक्त करण्यात आले. श्रीमती वनमाला दोशी यांची साखरेने तुला करण्यात आली व ती साखर माऊली फाउंडेशन काळबादेवी यांच्या आषाढी वारीत अन्नदानात देण्यात येईल.
माणुसकी, संस्कार, प्रेम आणि कुटुंब एकत्र ठेवण्याचे मूल्यआपल्या जीवनातून जपणाऱ्या या मातृशक्ती व संस्कारमूर्ती मातेस सहस्रचंद्र दर्शन या पावन सोहळ्यानिमित्त श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरव श्री मिहीरभाई गांधीसंस्थापक अध्यक्षश्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था यांच्या कडून करण्यात आला.
या कार्यक्रमास गुणवरेकर, वाल्हेकर , निमगावकर, वडुजकर , सन्मती सेवा दल परिवारातील सर्वच आप्तेष्टांनी व मित्र परिवारांनी घेतलेला सहभाग हीच खरी या अभिष्टचिन्तन सोहळयाचे वैशिष्टय आणि अविस्मरणीय क्षणांची मानवंदना होय .श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) मा.अध्यक्ष- जिल्हा परिषद,सातारा , फलटण नगरपालिकेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्रा राजे (ताईसाहेब) नाईक निंबाळकर, फलटणचे मा नगरसेवक श्री सचिन बेडके साहेब, नगरसेवक श्री पंकज पवार सर यांनी कार्यक्रमास उपस्थितीत राहून श्रीमती वनमाला दोशी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता रुचकर भोजनाने झालीं कार्यक्रमाचे सूत्र संचालक प्रफुल्ल शहा वडुजकर यांनीं केले.


