स्थानिक

कर्तृत्वाला मिळाले पदोन्नतीचे सुवर्णफळ,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकार्यकारी अभियंतापदी  प्रमोद अशोक सोनवणे यांची पदोन्नती

पुणे –  जिद्द, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि अथक परिश्रम यांच्या बळावर यशाचे शिखर गाठणारे  प्रमोद अशोक सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (महावितरण) उपकार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यापूर्वी त्यांनी सहाय्यक अभियंता म्हणून बरड, दहिवडी, अहिरे व नातेपुते या विभागांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावत वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि लोकाभिमुख सेवेमुळे त्यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे बंधू असलेले  प्रमोद सोनवणे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत यांचा मोठा वाटा आहे.

त्यांच्या पदोन्नतीमुळे सोनवणे कुटुंबासह मित्रपरिवार, सहकारी व हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या पुढील कारकिर्दीस उज्ज्वल यश लाभो, समाजहिताचे कार्य त्यांच्या हातून अधिक व्यापक प्रमाणात घडो, हीच सर्वांची सदिच्छा.

रक्षक रयतेचा परिवारातर्फे  प्रमोद अशोक सोनवणे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button