स्थानिक

रवी. दि.७ जून २०२६ रोजी विडणी येथे भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन

फलटण — पुरुषोत्तम (अधिक मास) निमित्त श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी विडणी येथे भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन घडविणारा हा आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे 

          सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर, विडणी येथे आयोजित या कार्यक्रमात श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या पादुकांचे दर्शन, अभिषेक, आरती, श्री शंकरगीता पारायण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमात सकाळी १० वाजता श्रींच्या पादुकांचे आगमन, सकाळी ११ वाजता पादुकांना अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ वाजता भव्य श्री शंकरगीता पारायण आणि सायंकाळी ५.३० वाजता महाआरती होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी नाव नोंदणी करावी तसेच पारायणासाठी येताना श्री शंकरगीता ग्रंथ सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

चौकट

श्री शंकरगीता पारायण सोहळा

📅 दिनांक : रविवार, ७ जून २०२६

📍 स्थळ : सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर, विडणी, ता. फलटण, जि. सातारा

कार्यक्रम वेळापत्रक :

सकाळी १०.०० वा. – श्रींच्या पादुकांचे आगमन

सकाळी ११.०० वा. – पादुकांना अभिषेक

दुपारी १२.०० वा. – आरती

दुपारी १.०० वा. – भव्य श्री शंकरगीता पारायण

सायं. ५.३० वा. – महाआरती

सायं. ६.०० वा. – महाप्रसाद

📞 संपर्क :

मिलिंद कदम – ९५५२७११७७७

निखिल (बाबूदादा) वाघमारे – ८३०८४०५०१७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button