स्थानिक

फलटणमध्ये ‘संडे SHGs मार्ट’चा उपक्रम१८ महिला बचत गटांचा सहभाग; स्थानिक उत्पादनांना मिळणार बाजारपेठ

फलटण : फलटण नगरपरिषदेअंतर्गत दीनदयाळ जनआजीविका योजना (DJAY-S) व आत्मनिर्भर शहर स्तर संघ (CLF) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘संडे SHG मार्ट’ या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे.

फलटण नगरपरिषदेच्या प्रांगणात दर रविवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारात शहरातील १८ महिला स्वयंसहाय्यता बचत गट सहभागी झाले आहेत. या माध्यमातून बचत गटांनी तयार केलेली विविध दर्जेदार उत्पादने नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ मिळवून देणे, महिलांच्या कौशल्याला व उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

फलटण तालुक्यातील नागरिकांनी दर रविवारी नगरपरिषदेच्या प्रांगणात भरविण्यात येणाऱ्या ‘संडे SHG मार्ट’ला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक व दर्जेदार उत्पादनांची खरेदी करावी आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button