स्थानिक

तब्बल 25 वर्षानंतर फलटण तालुक्यातून राजे गटाच्या विरोधातील व्यक्ती सातारा जिल्हा बँकेत संचालक मंडळात थेट बिनविरोध,माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर जिल्हा बँकेत संचालक, राजे गटाला मोठा हादरा तर खासदार गटाचा प्रचंड जल्लोष  

 फलटण : — सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संचालकपदी भाजपचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर फलटण तालुक्यातून ‘राजे गटा’च्या विरोधात असणारा चेहरा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रथमच पोहोचला असल्याने, या घटनेने फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

“झाडाची पाळेमुळे कितीही खोल असली, तरी योग्य वेळी मिळालेला वाऱ्याचा झोत संपूर्ण दिशा बदलून टाकतो”, या म्हणीप्रमाणे गेल्या अडीच दशकांपासून फलटणच्या सहकार क्षेत्रावर आणि जिल्हा बँकेवर राजे गटाची एकहाती सत्ता होती. मात्र, “सुगीचे दिवस कायम राहत नाहीत” हे सिद्ध करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या सूक्ष्म राजकीय रणनीतीच्या जोरावर स्वतः बिनविरोध निवडून जात विरोधकांचे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे.

या बिनविरोध निवडीच्या माध्यमातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील आपली राजकीय पकड आणि जनमानसातील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीनुसार, विरोधकांनी निर्माण केलेली आव्हाने मोडून काढत, सहकार क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाची चुणूक त्यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्याला दाखवून दिली आहे.

 गेल्या पावणेतीन दशकांपासून फलटण तालुक्यातून राजे गटाचेच वर्चस्व जिल्हा बँकेवर राहिले होते, त्याला प्रथमच सुरुंग लागला आहे. साधारण 2000 पासून जिल्हा बँकेवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे सदस्य त्यांच्यासोबत निवडून जात होते कधी दोन तर कधी तीन असे सदस्य रामराजेंच्या गटाचेच असायचे. त्यामध्ये स्वतः रामराजे,दादाराजे खर्डेकर विश्वासराव निंबाळकर यशवंतराव रणवरे, शिवरूपराजे खर्डेकर हे संचालक झाले होते. त्यामुळे जिल्हा बँकेवर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी चांगलेच वर्चस्व ठेवले होते. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती.

यंदा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विरोधकांना त्यांनी आव्हान दिले होते हे आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बिनविरोध निवडून येत यशस्वीरित्या पार केले आहे. तब्बल 25 वर्षानंतर फलटण तालुक्यातून राजे गटाच्या विरोधातील व्यक्ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत गेली आहे. हा राजे गटासाठी मोठा हादरा आहे.  

 या विजयामुळे आता  सोसायटी मतदार संघातून होणारी निवडणूक जिल्ह्यात सर्वात मोठी चूरशीची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे.

 दरम्यान आज रणजितसिंह नाईक निंबाळकर सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा आनंद उत्सव साजरा केला ठिकठिकाणी फटाकड्यांची आतषबाजी करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button