फलटण — महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कोळकी जिल्हा परिषद गटात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ते सुधारणा करणे साठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणुकीत लोकांना विकास कामाबाबत शब्द दिला होता तो शब्द रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी न पाळला १) भाडळी खुर्द ते पाटील वस्ती रस्ता सुधारणा करणे २२लाख ५०हजार २) दहिवडी रस्ता ते सासकल रस्ता ३७.५० हजार ३) सासकल ते झिरपवाडी रस्ता सुधारणा करणे २२.५० हजार .४) विमानतळ ठाकुरकी रस्ता ते पद्मावती मंदिर ठाकुरकी तावडी रस्ता सुधारणा करणे.. ३७.५० हजार ५) गिरवी ते दुधेबावी रस्ता सुधारणा करणे १. कोटी १३ लाख ६) विमानतळ ते ठाकुरकी १.१२ लाख ७) कुरवली खुर्द विचुरणी भाग कुरवली ते निरगुडी ४. कोटी ७० लाख रस्ता सुधारणा करणे .
तालुक्यातील सर्व रस्त्यांवर निधी मंजूर झाला आहे.. कोळकी जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीने मा.ना. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज उद्योग समुहाचे प्रमुख अँड जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर व सर्व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे भविष्यात या मतदारसंघातील जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे असा विश्वास जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे…