स्थानिक
फलटणमध्ये ‘श्री गणेशा आरोग्य अभियाना’ंतर्गत रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

फलटण:– श्रीमंत तिरुपती गणेशोत्सव मंडळ आणि कै. कमल दशरथ भिंगारे यांच्या स्मरणार्थ पृथ्वी चौक, फलटण येथे आयोजित करण्यात आलेले ‘श्री गणेशा आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
हे शिबिर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, लक्ष्मीनगर, फलटण’ यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर ५० हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी ‘अक्षय ब्लड बँक, मिरज’ यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीमंत तिरुपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर भिंगारे, उपाध्यक्ष करण देशमुख, तसेच सूरज भिंगारे, लंकेश भिंगारे आणि शुभम वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गायकवाड, अक्षय ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकुळे, तसेच स्थानिक स्टाफ नर्स, आरोग्य सेवक आणि आशा सेविका उपस्थित होत्या. या सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




